Share

Sanjay Shirsat | राजकारण कसं करायचं हे चंद्रकांत खैरेंना कळत नाही – संजय शिरसाट

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे शिंदे गटाच्या वतीने दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संजय शिरसाट यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. राजकारण कसे करायचे हे खैरेंना कळत नाही, असे शिरसाट म्हणाले. खैरंनी शपथ घेऊन सांगावे, त्यांना निवडणुकीत कोणी पाडले, असे देखील शिरसाट म्हणाले.

“मी अनेकवेळा सांगतो खैरेजी थोडं तोंड सांभाळून बोला. खैरे हे देवाला मानतात, त्यांनी देवाची शपथ घेऊन सांगावे त्यांना कोणी पाडले. माझं नाव असेल तर माझे नाव घ्या, पण एकदा खरं काय ते सांगा,” असे संजय शिरसाट म्हणाले.

25 हजार पेक्षा जास्त शिवसैनिक शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जाणार-

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, “अडीच वर्षांमध्ये जे निर्णय ठाकरे सरकारने घेतले नाही. त्यापेक्षा जास्त निर्णय आम्ही अडीच महिन्यात घेतले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले असून त्याचबरोबर दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने 25 हजार पेक्षा जास्त शिवसैनिक शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.”

जिल्ह्याचा खासदार हा शिंदे गटाचा होणार-

यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आता जिल्ह्याचा खासदार हा शिंदे गटाचा होणार असून त्या अनुषंगाने आपल्याला पुढील वेळी काम करायचं आहे.

तर कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले, “चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना आता एकच स्वप्न पडत असून ती म्हणजे संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर कोणत्या प्रकारे टीका करता येतील हेच ते शोधत असतात. मात्र आता त्याचाही काहीच फायदा होत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!