टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अन्य पक्षातील नेते भाजप सरकारने केलेला विकास पाहून भाजपात येत आहेत. विकासकामांमुळे जनतेत भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून अनेक विकास कामे केली आहेत. तसेच शेती, उद्योग, सामाजिक, संरक्षण क्षेत्रात सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र ३४ लाख हेक्टरवरून ४० लाख हेक्टर झाले. शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. त्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरात इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजप पक्ष नेते फोडत आहेत, असा आरोप केला जात आहे. यावरून चंद्रकांत पाटील विकासाची कास धरत प्रत्युत्तर दिले आहे.


