Share

चंद्रकांत दादा आता सामना वाचायला लागलेत आता त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- ईडी चौकशीवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे.

या नोटीशीनंतर शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. ‘हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप ! भाजपच्या नव्या घटना समितीचा विजय असो ! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण ! हेच तुमचे भविष्य !’ अशी टीका सामनातून करण्यात आली होती.

मागील काही दिवसांपासून सामनाच्या अग्रलेखात वाईट भाषा वापरण्यात आली होती. त्याबद्दल मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. रश्मी वहिनी संपादक असलेल्या वृत्तपत्राचा असा संपादकीय मजकूर असू शकत नाही, अशी भूमिका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, ‘अरे बापरे, मला आता त्यांची भीती वाटतेय. ते पत्र लिहतायेत,’ असं मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.

तसंच, ‘सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सामना वाचत राहिले तर त्यांचा विश्वास बसेल की पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,’ अशी टीका राऊतांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!