Share

मी पक्षावर नाराज नाही, विधान परिषदेसाठी माझ्या नावाचा विचार केला यासाठी धन्यवाद : बावनकुळे

Published On: 

नागपूर : विधानपरिषदेला संधी न मिळाल्यामुळे भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे हे नाराज असल्याचं बोललं जातं होत. मात्र त्यांनी आता समोर येऊन मी पक्षावर नाराज नसल्याचं म्हंटल आहे. मी नाव पाठवलं नाही आणि तिकीट मागितलं नव्हते. पक्षाने माझ्या नावाचा विचार केला  त्याबाबत धन्यवाद, असे सांगत  चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, पक्षाची भूमिका ठरली असेल. पक्षाने आमच्याकरिता काय  भूमिका घेतली आहे. त्यावेळी योग्य निर्णय घेऊ. पक्ष डावलत आहे, असे आजच्या दोन  घटनांवरून म्हणता येत नाही. पुढच्या काळात योग्य जबाबदारी मिळेल, अशी आशा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपकडून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत बावनकुळे यांचे नावं विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या यादीत टाकले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी या ज्येष्ठांना घरी बसवत नवीन नेत्यांना संधी दिली. खुद्द चंद्रकांतदादांनी आपली भूमिका मांडताना बावनकुळे यांना तिकीट मिळाले नसल्याबाबत दुःख व्यक्त केले. मला वाटतं पक्षाची भूमिका जो कार्यकर्ता जिथे उपयुक्त आहे, त्यानुसार ठरली असावी, असे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान पक्षानेच आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप एकनाथ खडसे हे वारंवार करत आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत नाथाभाऊंंना पक्षाने बरेच काही दिले, त्यामुळेच आता वरिष्ठांनी संधी नाकारली असेल, असे विधान केले आहे. यावर आता एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर देत पक्षात चंद्रकांत पाटील यांचे योगदान शून्य असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

एकाचवेळी २८ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आरोग्यमंत्री टोपेंच्या उपस्थित दिला डिस्चार्ज

चंद्रकांत पाटलांचे पक्षासाठी शून्य योगदान, एकनाथ खडसेंनी घेतला समाचार

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!