Share

चंद्रकांत पाटलांचे पक्षासाठी शून्य योगदान, एकनाथ खडसेंनी घेतला समाचार

Published On: 

मुंबई : विधान परिषदेवर संधी दिल्याने भाजपमधील ज्येष्ठ नेते हे चांगलेच नाराज झाले आहेत. तर पक्षानेच आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप एकनाथ खडसे हे वारंवार करत आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत नाथाभाऊंंना पक्षाने बरेच काही दिले, त्यामुळेच आता वरिष्ठांनी संधी नाकारली असेल, असे विधान केले आहे. यावर आता एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर देत पक्षात चंद्रकांत पाटील यांचे योगदान शून्य असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

नाराज एकनाथ खडसे आणि राज्यातील भाजप नेते यांच्यात चांगलेच द्वंद्व युद्ध पेटले आहे. एकनाथ खडसे हे आपली पक्षाप्रती असलेली नाराजी वारंवार बोलून दाखवत आहेत. तर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना बरेच काही मिळाले आहे. अजून किती देयचं असा सवाल उपस्थित केला आहे. यावर खडसेंनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.

पक्ष उभा करण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या. जेव्हा कुत्रंही पक्षाकडे येत नव्हतं अशा काळात आम्ही निवडून यायचो. आम्ही सतत निवडून यायचो म्हणून आम्हाला तिकीट दिलं. आम्हाला तिकीट देऊन काही मेहरबानी केली नाही, असे खडसे म्हणाले आहेत.

तर चंद्रकांत पाटलांना भाजपचा इतिहास माहीत नाही. ते विद्यार्थी संघटनेत होते. तिथं त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. भाजपमध्ये येऊन त्यांना फक्त दोन वर्षे झाली आहेत. त्यांचं विद्यार्थी चळवळीतील योगदान मोठं असलं तरी भाजपमधील योगदान शून्य आहे, असा टोला खडसेंनी लगावला. दरम्यान भाजपनेच खडसे यांच्या पत्नीला महानंदाचं चेअरमनपद दिले आहे, असा दावा केला होता. हा दावा खोटा असल्याचं खडसेंनी म्हंटल आहे. स्थानिक निवडणुकीत आम्ही पक्षाचं तिकीटही वापरलेलं नाही. सहकार क्षेत्रातील निवडणुकीशी भाजपचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे माझ्या पत्नीला महानंदाचं चेअरमनपद भाजपने दिलं हा आरोप खोटा आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या 

नाथाभाऊंंना पक्षाने बरेच काही दिले, त्यामुळेच आता वरिष्ठांनी संधी नाकारली असेल : चंद्रकांत पाटील

भाजपकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटले जातायत, खडसेंनी केला गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!