नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा देखील कोरानाच्या कचाट्यात सापडली आहे. त्यातचं आता एक दिलासादायक वृत्त आले आहे. मालेगाव येथील कोरोनाबाधित पोलिसांनी आता कोरोनावर मात केली आहे. त्यांना काल संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत या २८ पोलीस तसेच शहरातील इतर आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी पोलिसांनी पोलीस बॅण्डने ‘हम होंगे कामयाब’ची धुन वाजवून आरोग्य व पोलीस यंत्रणेला लढण्याचे बळ दिले. मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या ३३ पोलिसांना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले.
दरम्यान राज्यात कोरोनाने बऱ्यापैकी अनेकजणांना आपल्या कवेत घेतले आहे. मुंबई-पुणे या प्रमुख शहरांनाचं कोरोनाने लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद, मालेगाव- नाशिक, इकडे देखील दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 वर गेली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
एकाचवेळी 22 जण कोरोनाबाधित, रत्नागिरी जिल्ह्यात धोका वाढला
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 ची नुकसान भरपाई वाटप होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

