🕒 1 min read
परळी:- माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा काल 80 वा वाढदिवस झाला. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली. काल शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. काल 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला. केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची स्टेजवर झुंबड उडाली होती, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मन खचून गेले हे बघून… महाराष्ट्रात ६० वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहीना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या ६० वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते. pic.twitter.com/MsfY67UX6B
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 13, 2020
धनंजय मुंडें यांनी आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात 81 किलोचा केक आणण्यात आला होता, तो गोविंदा आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते कापण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर स्टेजवरील केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. अक्षरशा धुलवड खेळल्यासारखं एकमेकांच्या तोंडाला केक लावण्याचा कार्यक्रम कार्यकर्ते करत होते. आता या केकच्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णबला दणका; रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक
- महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला तर ‘तो’ दिवस दूर नाही -प्रफुल पटेल
- ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने, संयमाने साजरा करु’
- महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू
- उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन, भाजपचा चहापानावर बहिष्कार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

