पुणे : राज्यात थंडी गायब झाल्याचे जाणवत आहे. अनेक जण थंडीची आतुरतेने वाट पाहत आहे. पण नोव्हेबर महिना आला असून देखील म्हणावा तेवढी थंडी असल्याचे दिसत नाही. याउलट अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यात पुढच्या आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
राज्यातही थंडीची चाहूल कमी होत असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता. मुंबई, ठाणे, पुण्यासह काही ठिकाणी राज्यात हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

