अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली होती. पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली असून यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण व तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील ४८ तासांत याचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच २१ नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल.
या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाला आहे. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांना गर्मीचा सामना करावा लागत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे या जिल्ह्यामध्येही थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस नगर शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण बाहेर पडू नका, पुढचा महिनाभर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा; महापौरांचे आवाहन
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- नागपूर : मनपाच्या २९ शाळा / कनिष्ठ महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून सुरु होणार
- मर्यादित संख्येत कार्तिकी यात्रेची परंपरा जोपासावी : आचार्य तुषार भोसले
- ‘माझे लाईट बिल माझी जबाबदारी ; महाविकास आघाडी सरकारची नवीन योजना’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

