पुणे : महाराष्ट्रातच नाही तर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात रुग्णवाढीचा कमी झालेला आलेख बुधवारपासून पुन्हा चढला आहे. ही कोरोनाच्या नव्या लाटेची नांदी असू शकते. त्यामुळे पुणेकरांनी सावध राहावं, असा इशारा महापालिकेनं दिला आहे. पुण्यात गुरवारी (१९नोव्हेंबर) दिवसभरात ४११ नवे पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २२ दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे.
२९ ऑक्टोबरपासून पुण्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ४११ पेक्षा कमी राहिली आहे. गेल्या काही दिवसात तर दीडशेच्या आत नव्या रुग्णांची नोंद होत होती. पण १९ नोव्हेंबरला पहिल्यांदाच कोरोनाची रुग्णांची संख्या एकदम वाढली आहे.
पुणे कोरोना अपडेट : गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
◆ उपचार सुरु : ४,४७५
◆ नवे रुग्ण : ४११ (१,६५,८३७)
◆ डिस्चार्ज : ३१६ (१,५६,९५५)
◆ चाचण्या : ३,३२९ (७,७७,२०८)
◆ मृत्यू : ०६ (४,४०७)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/yGgG9AVcJc— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 19, 2020
दिवाळीपूर्वी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली होती. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला होता. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्याने तुफान गर्दी करत पुणेकरांनी निष्काळजीपणा केला होता. दरम्यान, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यात दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आपण टेस्टिंगही वाढवलंय. आगामी महिनाभराचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून महापालिकेची वैद्यकीय सज्जता आहेच, मात्र माझी सर्वांना विनंती आहे, विनाकारण बाहेर पडू नका, गर्दी टाळा. बाहेर वावरताना योग्य काळजी घ्या. असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे.
गेल्या दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आपण टेस्टिंगही वाढवलंय. आगामी महिनाभराचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून महापालिकेची वैद्यकीय सज्जता आहेच, मात्र माझी सर्वांना विनंती आहे, विनाकारण बाहेर पडू नका, गर्दी टाळा. बाहेर वावरताना योग्य काळजी घ्या.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 19, 2020
महत्वाच्या बातम्या
- नागपूर : मनपाच्या २९ शाळा / कनिष्ठ महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून सुरु होणार
- मर्यादित संख्येत कार्तिकी यात्रेची परंपरा जोपासावी : आचार्य तुषार भोसले
- राज्यभर धुरळा उडणार, नव्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम
- राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार!
- खडसेंपाठोपाठ भाजपचा दिग्गज नेता कोरोनाच्या विळख्यात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

