Share

‘माझे लाईट बिल माझी जबाबदारी ; महाविकास आघाडी सरकारची नवीन योजना’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला होता. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं होत.

त्यावरच भाजप आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकासआघाडी सरकारची कोंडी केली. लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले आहे. याच मुद्यांवरून विरोधीपक्ष नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळात आहे.

दरम्याम, आता  भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही या वादात उडी घेतली आहे. ट्विटरवरुन सोमय्या यांनी ‘माझे लाईट बिल माझी जवाबदारी’ असं म्हणतं ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी’, असा टोला लगावला आहे. हे आपल्याला एका पत्रकाराने पाठवल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!