Share

Uddhav Thackeray | “हिमंत असेल तर उद्धव ठाकरेंनी…”, शिंदे गटातील खासदाराचं जाहीर आव्हान

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यामध्ये शेतकरी मेळाव्यासमोर आक्रमक भाषण करत शिंदे गटावर हल्लाबोल केला. त्यावर शिंदे गटाकडून टीकाही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शिंदे गटाच्या ज्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी भाषणात बोलताना आव्हान दिलं होतं, त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील खासदार प्रताप जाधव (Pratap Jadhav) यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.

यावेळी, माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी. मी शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार. भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा विषय येतो कुठे? आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. शिवसेनेचेच आहोत. बाळासाहेबांच्याच विचारांनी आम्ही चाललो आहोत, असं आव्हान प्रताप जाधव यांनी दिलं आहे.

खोके आणि बोके.. खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का? उद्धव ठाकरेंनी सीआयडी वगैरे जेवढ्या यंत्रणा असतील, त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केलं, तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी फक्त एकदा हे सिद्ध करून दाखवावं”, असं आव्हान संजय गायकवाड यांनी दिलं होतं.

दरम्यान, इथले गद्दार खासदार आणि आमदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, त्यांचा चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!