टीम महाराष्ट्र देशा:-देशभरात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात देशात कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे आणि कांद्याचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून या निर्णयाची काहीच गरज नाही असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याची आवक घटली असून भाव वाढत आहेत. त्यामुळे अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे मागणी तसा पुरवठा ते तत्त्व पाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातीच्या बंदीने परदेशातील निर्यातीचा कांदा उद्या देशभरातील बाजारपेठेत वळता केला जाईल. परिणामी बाजारपेठेत कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊन कांद्याचे भावही घसरणार आहेत. सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा परिणाम थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणार असल्याने त्यांनी कांदा निर्यात बंदीला विरोध केला जात आहे. त्याशिवाय सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता निर्यातच बंद केली तर शेतकऱ्यांना मिळणारा कांद्याचा भाव कोसळणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांवर जेव्हा ५० पैशांनी कांदा विकण्याची वेळ सरकारवर आली तेव्हा सरकारने असा निर्णय घेतला नाही. सरकारचा हा निर्णय म्हणजे निव्वळ पोरखेळ असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. कांद्याच्या वाढत्या दरामुळे देशातील ग्राहकांवर काही परिणाम होताना दिसत नाही. मग असे निर्णय घेऊन सरकार शेतकर्यांना का धारेवर धरत आहे असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178278432867680256?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178278984359899138?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

