Share

बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले टाकणे आवश्यक -शिवसेना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशामध्ये हिंदूची मंदिरे, धार्मिक स्थळे इतकेच नाही तर आता हिंदूच्या घरावरही हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संबंधीत केंद्र सरकारच्या वतीने ठोस पावले टाकणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.

बांगालादेशामध्ये हिंदू समाजाच्या मंदिरावर आधी हल्ला करण्यात आला होता. त्या नंतर या हल्ल्यांची मालिका सातत्याने सुरू आहे. कथिथ क्लिप संदर्भात होत असलेल्या या हल्ल्यामुळे तिथल्या हिंदू समूदायाकडून जोरदार निर्दशने करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीनेही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.

बांगलादेशमधील ६० पेक्षा जास्त हिंदूंची घरे जाळण्यात आली असल्याचा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते अंबादास दानवे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले की, ‘आता तर हद्दच झाली! बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हिंदुस्थानातील केंद्र सरकारने ठोस पाऊल टाकणे नितांत आवश्यक आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!