मुंबई: गुटखा आणि तत्सम पदार्थ हे आरोग्यास हानिकारक असताना देखील सरसे पदार्थांचे सेवन होताना दिसते. तरुणांमध्ये या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर शासनाने वेळोवेळी बंदी घालून देखील गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा यामुळे हे प्रमाण वाढले आहे.
यामुळे केंद्र सरकारने गुटखा निर्मिती आणि विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी, अशी मागणी करतानाच महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहेच. परंतु तरीही राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्यात यावा. गुटखा सेवन करून काही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतात. इतरांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्यानेच देशभरातही गुटखा विक्रीवर बंदी आणा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत केली आहे.
केंद्र सरकारने गुटखा ची निर्मिती व विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी कारण महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीची बंदी असतांना देखील दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांद्वारे येऊन तो सहजरित्या उपलब्ध होतो.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
तसेच याचे सेवन करणारे सार्वजनिक ठिकाणी थुंकून लोकांच्या आरोग्या ला देखील घातक ठरतात .@PMOIndia ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@zee24taasnews ,@News18lokmat ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
गुटख्याचे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर तसेच अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिले होते. ज्या क्षेत्रात गुटखा आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल. त्या ठिकाणच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या तसेच पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- चिल, डोनाल्ड चिल ! म्हणत १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना मतमोजणी थांबवण्यावरून सुनावले…
- देशभरातील महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यासाठी युजीसीकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
- टीआरपी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन
- खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल
- राज्यपाल चांगली व्यक्ती ते प्रस्तावाला विरोध करणार नाहीत – भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

