Share

टीआरपी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन

Published On: 

नवी दिल्ली-केंद्र सरकारने भारतातील- दूरचित्रवाणी रेटिंग एजन्सीविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेम्पत्ती यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत चार सदस्य आहेत. यात डॉ शलभ, सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक, गणित आणि सांख्यिकी विभाग,आयआयटी कानपूर, डॉ राजकुमार उपाध्याय, कार्यकारी संचालक, सी-डॉट आणि प्रा. पुलक घोष, सार्वजनिक धोरणविषयक केंद्र, अशी या सदस्यांची नावे आहेत.

‘एक सशक्त, पारदर्शक आणि उत्तरदायी रेटिंग व्यवस्था’ तयार करण्यासाठी, आवश्यक असल्यास, सध्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल सुचवण्याविषयी, शिफारस करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर होत असलेल्या कार्यान्वयनाचे अध्ययन केल्यानंतर, या मार्गदर्शक सूचनांमध्ये नव्याने बदल करण्याची गरज भासते आहे. विशेषतः भारतीय दूरसंचार नियामक संस्था-ट्रायने अलीकडेच केलेल्या शिफारसी, ज्यात, तंत्रज्ञानविषयक अद्ययावतीकरण करुन व्यवस्थेत बदल करणे आणि रेटिंग प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक करत ती अधिक सुदृढ करण्याविषयीची गरज ट्रायने व्यक्त केली आहे. या आधारावर समिती स्थापन करण्यात आली असून, गेल्या काही काळात बदललेल्या, भारतातील दूरचित्रवाणी रेटिंग व्यवस्थेविषयीच्या सर्व पैलूंचा ही समिती अभ्यास करेल,असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

ही समिती,सध्याच्या रेटिंग व्यवस्थेला अद्ययावत करेल, ट्रायने वेळोवेळी केलेल्या शिफारसींचा आणि दूरचित्रवाणी उदयोगातील सद्यपरिस्थितीचा अभ्यास करेल, तसेच या क्षेत्राशी संबंधित सर्व हितसंबंधी गटांच्या गरजा समजून घेत, त्यानुसार एक सशक्त, पारदर्शक आणि उत्तरदायी रेटिंग व्यवस्था तयार करण्यासाठी आवश्यक त्या बदलांची शिफारस करेल, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!