Share

जर चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल; आठवलेंचा सरकारला इशारा

Published On: 

मुंबई  – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी संपूर्ण जगात आनंद उत्साहात साजरी होतो.मात्र मागील वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू झाल्याने गेल्या वर्षी ज्या प्रमाणे साधेपणाने भीम जयंती साजरी झाली त्याच प्रमाणे यंदाही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता घरी राहून बुद्ध भीम प्रतिमा पूजन करून साजरी करावी असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

दि.14 एप्रिलला चैत्यभूमी येथे गर्दी करण्या ऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन  रामदास आठवले यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत वर्षा पेक्षा या वर्षी कोरोना चे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहेत. त्यामूळे यंदा भीम जयंती ला चैत्यभूमी येथे दर्शनासाठी गर्दी न करता घरी राहून ; शासनाचे नियम पाळून; ऑनलाईन अभिवादन करून जयंती साजरी करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. दि. 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी 5 लोकांना परवानगी द्यावी अशीही सूचना रामदास आठवले यांनी केली.

चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक येथील स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. चैत्यभूमी च्या पवित्र ऐतिहासिक स्तुपाची दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. जर कधी चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचे दुष्परिणाम मुंबई मनपाला ,राज्य शासनाला भोगावे लागतील असा ईशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. चैत्यभूमीचे लवकर ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना रामदास आठवले यांनी मनपा प्रशासनाला केली.

चैत्यभूमी च्या विकासासाठी निधी मनपा कडे उपलब्ध असताना स्तूपाची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्न  रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर चैत्यभूमी ही खाजगी जागेवर उभी असल्याने मनपा ला तातडीने निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर प्रकाश आंबेडकर,भीमराव आंबेडकर,आनंदराज आंबेडकर सर्व आंबेडकर बंधू आणि संबंधितांच्या सहमतीने चैत्यभूमीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना  रामदास आठवले यांनी केली. येत्या दि. 14 एप्रिलला बांद्रा पूर्व येथील जिल्हा अधिकारी कार्यालया समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.अशी माहिती  रामदास आठवले यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!