Share

दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात, टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार

Published On: 

नवी दिल्ली- युएईमध्ये पार पडणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीची गटवारी आज जाहीर करण्यात आली आहे. समस्त क्रिकेटविश्वाचं ज्या सामन्याकडे लक्ष असतं त्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची मेजवानी यंदाही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

हा टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. हा विश्वचषक यापूर्वी भारतात आयोजित केला जाणार होता. मात्र, कोरोनाचे संकट पाहाता विश्वचषकचे आयोजन ओमान आणि युएईमध्ये करण्यात आले आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत.

ओमान आणि यूएई येथे खेळल्या  जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.

आयसीसी क्रमवारीत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर १२साठी पात्र ठरलेले आहेत. सुपर १२ संघांची दोन गटांत विभागणी केली गेली आहे आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शारजाह या तीन मैदानावर होतील. त्यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन सेमी फायनल व एक फायनल अशी स्पर्धा पार पडणार आहे.

पहिला गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, गट अ मधील अव्वल क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ

दुसरा गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील अव्वल क्रमांकाचा संघ

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!