Share

नगरमध्ये शिवसेनेत जातीचं राजकारण, उद्धव साहेब शिवसेनेला वाचवा; शिवसैनिकाचे पत्र…

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी येत्या गुरूवारी (दि.१ ऑक्टोबर) रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधीच शिवसेनेत स्विकृत नगरसेवक निवडीवरुन पुन्हा रणकंद सुरू झाले आहे. अनिलभैय्यांनी आजपर्यंत कधीच जातीचे राजकारण केले नाही, पण आता अहमदनगर शहरात जातीचे राजकारण सुरु झाले आहे. आपण यात लक्ष घालावे, अन्यथा शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल. अशी भीती व्यक्त करणार पत्र अहमदनगरमधील शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अहमदनगरमध्ये येत्या गुरुवारी स्विकृत नगरसेवक भरणार आहे. आजपर्यंत दिवंगत नेते अनिल राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही म्हणूनच शिवसेना बळकट राहिली. परंतु काही दिवसांपासून पक्षात जातीचे राजकारण होत असून, राठोड यांनाही त्याच जातीच्या राजकारणाने पराभूत केले होते. आजही स्विकृत नगरसेवक भरतीच्या वेळी जातीचे राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. तरी आपण याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती शेळके यांनी पत्रात केली आहे.

महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदासाठी पाच जागांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ व भाजपचा १ असे वाटप आहे. आता प्रत्येक पक्षाचे गटनेते आपल्या संख्याबळानुसार सदस्यांच्या नावांची शिफारस करतील. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शहरात शिवसेनेची घडी बसविण्यासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख प्रयत्न करीत आहेत. मागील ३० वर्षांपासून स्व.अनिल राठोड यांनी अहमदनगरमध्ये शिवसेना जिवंत ठेवली. परंतु त्यांच्या निधनानंतर मंत्री गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत गडाख यांनी माघार घेतल्यामुळे शहरातील कट्टर शिवसैनिक नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचाच उद्रेक आज शेळके यांनी पाठविलेल्या पत्राच्या रुपाने दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!