जळगाव : सन २०१९-२० या वर्षातील हवामानावर आधारित केळी फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न देणाऱ्या रावेर तालुक्यातील चार तर मुक्ताईनगरातील दोन अशा सहा बँकांवर शुक्रवारी कृषी विभागाने गुन्हे दाखल केले. रकमा अदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा मुदतवाढ दिली होती. तरीही त्यांनी ३८ शेतकऱ्यांना पीक विम्याचे ९१ लाख ८२ हजार १८५ रुपये दिले नसल्यामुळे कृषी विभागाने ही कारवाई केली.
पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वारंवार निर्देश दिले. तरीही या चार बँकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्हा तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम देण्याची जबाबदारी बँकांवर निश्चित करत ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देण्यास सांगितले. तरीही उपयोग न झाल्याने ८ जूनच्या बैठकीत बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
तरीही बँकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खानापूर सेंट्रल बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक पंकज सारंगधर केदारे व नितीन यशवंत शेंडे, रावेर आयसीआयसीआय बँकेचे शाखा प्रबंधक ऋषिकेश शिवाजी गव्हाणकर यांच्यासह इतर तीन बँकाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- कल्पिता पिंपळेंवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची रवानगी आता ठाणे कारागृहात
- ‘४५० कोटी रूपये खर्च करून ओबीसी जनगणना होणार’, नाना पटोलेंची माहिती
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

