मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना फोन करून त्यांच्यापाठीमागे सरकार खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा, असा शब्दच ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना दिला आहे.
तसेच यावेळी ते फोनवर बोलताना म्हणाले कि, ‘आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान कल्पिता पिंगळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी आता ठाणे कारागृहात करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘४५० कोटी रूपये खर्च करून ओबीसी जनगणना होणार’, नाना पटोलेंची माहिती
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


