औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या परीक्षेनंतर उत्तरपत्रिका बदलल्याचा आरोप असलेले बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात सप्टेंबर २००१ मध्ये छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा ते आमदार नव्हते. या खटल्याच्या सुनावणीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. आर. शिंदे यांनी क्षीरसागर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. माधव गुमास्ते यांनी फिर्याद दिली होती. १२ ते १३ सप्टेंबर २००१ दरम्यान विद्यापीठातील बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवलेल्या अभियांत्रिकेच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. १३ सप्टेंबर २००१ रोजी सकाळी गुमास्ते यांना वॉचमनने माहिती दिली की, बॅडमिंटन हॉलचे कुलूप तोडून काही जणांनी उत्तरपत्रिका लंपास केल्या व तिथे बनावट उत्तरपत्रिका ठेवल्या.
त्यापैकी एक १११०८० क्रमांकाची उत्तरपत्रिका संदीप क्षीरसागर यांची होती. त्यामुळे प्रकरणात २५ सप्टेंबर २००१ रोजी क्षीरसागर यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात कलम ४६५, ४२०, ४६८, ४५४, ४५७, ३८० आणि ३४ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी १२ मे २००३ दोषारोपपत्र दाखल केले होते.
संदिप क्षीरसागर यांच्या वकिलाचा युक्तीवाद
क्षीरसागर यांच्या वतीने अॅड. के. जी. भोसले यांनी युक्तिवाद केला. कोर्टात ते म्हणाले की, बॅडमिंटन हॉलमध्ये कडेकोट पहारा होता. तेथे कोणी प्रवेश करून उत्तरपत्रिका बदलू शकत नव्हता. वॉचमनचा जबाब घेतला नाही. उत्तरपत्रिका कोणी बदलल्या याचा सबळ पुरावा नाही. उत्तरपत्रिकेचा नंबर कोणाचा हे परीक्षा नियंत्रकाशिवाय कोणालाही माहिती नसते. उत्तरपत्रिका पुनर्तपासणीचे काम २५ प्राध्यापक सतत करत होते. त्यामुळे उत्तरपत्रिका बदलल्या की नाही सांगता येणार नसल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुराव्याअभावी क्षीरसागरांची निर्दोष मुक्तता केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

