🕒 1 min read
जालना: जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी-सतोन रस्त्यावर एका चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवत कार चालकाला खाली उतरवून त्याची कार घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली होती. या बाबतची तक्रार कार चालकाने पोलिसांकडे केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तासाभरातच त्या चोराला ताब्यात घेतले आहे. त्याच सोबत चोराने पळवलेली कार देखील चोराकडून जप्त करण्यात आली आहे.
आष्टी पोलिस ठाण्यातील कर्मचारी अमोल तिबोले याना गाडीमालक भागवत घाडगे यांनी फोन करून सांगितले की, त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी (एमएच २१ एएक्स २५९०) चालक बळीराम टेकाळे हा सेलू येथून एकटाच घेऊन येत असताना त्याला आष्टी-सातोना रस्त्यावर हस्तूर तांडा पाटीजवळ पल्सर गाडीवर तिघांनी येत गाडी आडवी लावत थांबवून बंदुकीचा धाक दाखवत, त्याचा मोबाइल पाकीटसह गाडी घेऊन त्याला खाली उतरून पळाले आहेत, असे सांगितले. तिबोले यांनी तत्काळ ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांना दिली.
पोलिसांनी गाडीचा नंबर व माहिती नजीकच्या पाथरी, सेलू, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, अंबड, परतूरसह वरिष्ठांना दिली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत गाडी घेऊन पसार झालेल्या आरोपींच्या दिशेने तपास सुरू असतानाच पोलिसांना गाडी कुंभार पिंपळगाव येथील चौकीच्या कर्मचाऱ्यांनी पकडल्याची माहिती दिली. आष्टी पोलिसांनी कुंभार पिंपळगाव येथून गाडीसह आरोपीस बंदुकीसह ताब्यात घेतले. मात्र त्याचे दोन साथीदार पल्सर गाडीसह पसार झाले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप, अमोल तिबोले, सूरजसिंग चारावनडे, आर. आर. गौड, बिक्कड आदींनी केली.
महत्वाच्या बातम्या
- जडेजाच्या खेळीवर सातत्याने होत होत्या टीका ; धोनीने केली ‘अशी’ मदत
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका


