🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भाराताची अवस्था अत्यंत बिकट केली. अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडलाच, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. मात्र अखेरचा फलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने तो फलंदाजी करू शकला नसल्याने ३९ धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला. जोश हेझलवूडने घातक गोलंदाजी करत ८ धावा देत ५ फलंदाजांना तंबूत धाडलं. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“हा पराभव खूप जिव्हारी लागण्यासारखा आहे, कदाचीत शब्दांत मांडता येणार नाही. आमच्याकडे ६० धावांची आघाडी होती आणि त्यानंतर सगळा डाव कोलमडला. दोन दिवस तुम्ही मेहनत करुन सामन्यात आपल्या संघाची बाजू वरचढ ठेवता पण एका तासाच्या खेळात चित्र असं काही बदलून गेलं की तिकडून सामना जिंकणं आमच्यासाठी केवळ अशक्य झालं. आम्ही विजयाच्या भावनेने खेळलोच नाही. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच मारा करत होते, पण आमचे फलंदाज फक्त धावा कशा जमवता येतील याचा विचार करत होते.”
गोलंदाजांनी काही विशेष कामगिरी केली असं मला वाटत नाही, पण धावा जमवणं कठीण वाटत होतं. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी घेतला, अशा शब्दांमध्ये विराटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो मायदेशी परतणार आहे. विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
