Share

कर्णधार विराट कोहलीचा ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरव

Published On: 

अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं.

इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या.

यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. या सामन्यात विराटने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. विराटने सुरुवातीपासून या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

विराटने या 5 सामन्यांच्या मालिकेत एकूण 231 धावा केल्या. यामध्ये त्याने खणखणीत 3 अर्धशतकं झळकावले. विशेष म्हणजे विराट या तिनही वेळेस नाबाद राहिला. तसेच विराटने या पाचव्या सामन्यात 80 धावांच्या नाबाद खेळीसह अनेक विक्रम केले. विराट टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विराटच्या नावे यासह आता टी 20 मध्ये कर्णधार म्हणून 1 हजार 463 धावांची नोंद झाली आहे. दरम्यान आता टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!