Share

कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

Published On: 

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

कल झालेल्या एकदिवशीय सामन्यासाठी शिखर धवन मैदानात उतरताच एका मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. 18 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होताच या ऐतिहासिक विक्रमाची नोंद शिखर धवनच्या नावे झाली आहे.

18 जुलै रोजी श्रीलंकाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जेव्हा शिखर धवन मैदानावर उतरला तेव्हा तो कर्णधार म्हणून सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार ठरला. धवनचे वय हे 35 वर्ष 225 दिवस आहे. अशाप्रकारे त्याने 1984 मध्ये पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रम मोडला आहे. अमरनाथ यांनी 34 वर्ष 37 दिवशी पाकिस्तानविरुद्ध सियालकोट येथे कर्णधार म्हणून पदार्पण केले होते.

तसेच शिखरच्या नवे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. धवनने या एकदिवशीय सामन्यात १७ धावा पुर्ण करताच श्रीलंकेविरुद्ध सर्वात वेगवान १००० धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज बनला आहे. श्रीलंकेविरुद्ध १७व्या डावात धवनने ही कामगिरी केली आहे. यापुर्वी हाशीम आमलाने १८ डावात ही कामगिरी केली होती. त्यानंतर सौरव गागुंली(२०) आणि क्विटंन डिकॉक(२१) यांचा समावेश होतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!