Share

दमदार विजयानंतर कर्णधार शिखरने गायले खेळाडूंचे गुणगान, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३७व्या षटकात ३ गडी गमावत हे अव्हान सहज पार केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली. या सामन्यात पृथ्वी शॉने २४ चेंडुत ९ चौकारासह ४३ धावांची खेळी केली. तर अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पारदर्पण करणाऱ्या किशनने 33 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि 59 धावा केल्या.

या सामन्यानंतर कर्णधार धवनने युवा पॉवर-हिटर पृथ्वी शॉ आणि नवोदित ईशान किशन यांच्या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे. धवन म्हणाला, ‘आमचे सर्व खेळाडू परिपक्व तसेच आक्रमकही आहेत. ज्या प्रकारे ते खेळले त्यामुळे मी खूप खुश आहे. दुसर्‍या टोकाला असणं आणि पृथ्वी आणि ईशान पाहणं चांगलं होतं. मी त्यांना सांगत होतो की आरामात खेळा. ही युवा मुले ज्याप्रकारे आयपीएलमध्ये खेळत आहेत, त्यांना बरीच एक्स्पोजर मिळाले आहे आणि त्यांनी पहिल्या 15 षटकांतच हा खेळ संपविला,’ यासह शिखरने सूर्यकुमार यादवचेही कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!