परभणी : जिल्ह्यात मंगळवारी १ हजार २११ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्या तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे.
शासकीय रुग्णालयातील कक्षामध्ये ५ हजार ९०५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ६८९ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत २७ हजार २९८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी २० हजार ७०४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख १६ हजार ४०२ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ८८ हजार ३२५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २७ हजार १५० व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ७८७ अनिर्णायक तसेच १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
परभणी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा वाढत चाललेलाच दिसुन येत आहे. तर आकड्यामध्ये एकही दिवस कमी आल्याचे आढळुन येत नाही, त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. अत्यावश्यक असले तरी विनामास्क घराच्या बाहेर पडू नये. स्वच्छ हात धुवावेत. सॅनेटायझरचा वापर नियमीतपणे करावा. नागरिकांनी अस्वस्थ वाटत असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
- औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी मदत केंद्राची स्थापना
- परिवहन महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारचा नवा फंडा
- औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या ‘या’ महत्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात!
- रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळणार पण…
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात, निर्मात्यांना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

