Share

मुठभर लोकांसाठी २३ कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळू शकत नाही- योगी आदित्यनाथ

Published On: 

नवी दिल्ली : आम्ही काही मुठभर लोकांसाठी २३ कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळण्याची सूट देऊ शकत नव्हतो. म्हणूनच कायद्यानुसार आम्ही तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई केली, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

कौतुकास्पद : धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी शेकडो संघ स्वयंसेवक उतरणार मैदानात

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये योगींनी तबलिगी जमातसंदर्भातील कारवाईबद्दल भाष्य केले. तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता असा दावा केला आहे.

तबलिगी जमातच्या सदस्यांमुळे करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अडचणी निर्माण झाल्या. अशा लोकांविरोधात आम्ही कारवाई केली. त्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही दिल्लीलाही काही जणांना पाठवले होते, असेही योगी यांनी स्पष्ट केले आहे.

नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल

यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर देखील हल्लाबोल केला.ते म्हणाले की, कॉरोनाच्या संकटात कॉंग्रेस कुठेही दिसली आहे. दिसले ते त्यांचे खलनायकी भूमिकेत दिसले. कॉंग्रेसने कुठेही बसेसची व्यवस्था केली नाही. आम्ही 15 हजारहून अधिक बसेसची व्यवस्था केली. औरैया अपघातावर राजकारण केले गेले. कॉंग्रेस शासित राज्यांनी कोरोना संक्रमण वाढविले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!