औरंगाबाद : कंपनीतील कामगाराच्या खिशात पन्नास रुपयांचा गांजा आढळल्यावरुन मजूर ठेकेदाराकडून साठ हजाराची लाच स्विकारलेल्या जमादाराला एसीबीने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तब्बल सात दिवसांनी ठेकेदाराकडील कामगारावर गांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील जमादाराला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी त्याची हर्सुल कारागृहात देखील रवानगी करण्यात आली. पण पोलीस निरीक्षकांनी गांजा सदृश्य एक दीड ग्रॅम वस्तू आढळून आल्याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी वाळुज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक मंगेश खैरनार असे गुन्हा दाखल केलेल्या कामगाराचे नाव आहे.
एमआयडीसी वाळुज परिसरात यशश्री प्रेस कम्पस नावाची कंपनी आहे. या कंपनीत ठेकेदारामार्फत दीपक खैरनार हा कामाला लागला. कंपनीत अंगझडतीमध्ये त्याच्या खिशात गांजाची पुडी आढळल्याचा तक्रार अर्ज कंपनीने पोलीस ठाण्यात दिला होता. काही कारणाने कंपनीने अर्ज मागे घेतला होता. मात्र, पोलिसांनी हा अर्ज तसाच राखून ठेवत ठेकेदाराकडे सुरूवातीला कारवाई न करण्यासाठी एक लाखांची मागणी केली होती.
त्यानंतर ही मागणी दीड लाखांवर गेली होती. त्यामुळे वैतागलेल्या ठेकेदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. त्यावरुन सापळा रचत एसीबीने जमादार गणेश अंतरप याला ६० हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केली होती. तर उपनिरीक्षक सतीश पंडीत हे अजूनही संशयाच्या भोव-यात आहेत. त्यांची पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या आदेशाने विभागीय चौकशी होईपर्यंत नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर तब्बल सात दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या तक्रारीवरुन कामगार दीपक खैरनारविरुध्द गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२४/२०२१ कलम ८ (क) २० (ब) २ (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार, दीपक खैरनार हा कंत्राटी कामगार असून, आज तक्रारी अर्जदार यांना संपर्क करुन त्यांना या इसमाविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी विनंती केली होती. मात्र, कंपनीने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे माझी दीपक खैरनार याच्याविरुध्द तक्रार आहे. ५० रुपये किंमतीच्या एका पारदर्शन छोट्या प्लास्टिक पन्नीसह २.७६० वजन व विना पन्नीचे १.४२० ग्रॅम वजनाचा ओलसर अंमली पदार्थ गांजा सदृश्य वस्तू असलेली एक पुडी ५० रुपये किंमतीची छोट्या प्लास्टिकच्या पन्नीसह आढळून आली आहे. एकुण शंभर रुपयांचा वर्णनाचा माल ताब्यात मिळून आल्याने गुन्हा दाखल असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार


