औरंगाबाद : जगामध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पसरू लागल्याने संपूर्ण राज्य भीतीच्या सावटा मध्ये आहे.कोरोना व्हायरस चा धोका वाढला असून कालपर्यंत ८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असताना आता त्यात अजून एका कोरोनाग्रस्ताची त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ९ झाली आहे. तर महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या 12 झाली आहे. त्यामुळेच शक्य त्या उपाययोजना राज्य सरकार करत आहे.
कोरोना विषाणूबाबतच्या मंत्रालयातून घेण्यात आलेल्या राज्यव्यापी आढावा बैठकीत यात्रा, सामुदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) औरंगाबाद मंडळांतर्गत पैठण येथील १३ मार्च रोजी होणाऱ्या म्हाडाच्या सदनिकांची पूर्व नियोजित विक्री सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. तरी सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. पुढील सोडतीचा कार्यक्रम लवकरच कळविण्यात येईल, असे म्हाडाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी कळवले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
