Share

शहर अभियंता पानझडे यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करा; मनपा आयुक्तांना मागणी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :शहर अभियंता सखाराम पानझडे यांना देण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी औरंगाबाद सफाई कामगार संघटनेतर्फे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Astik Kumar Pandey) यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे, तत्कालीन शहर अभियंता हे महानगरपालिकेतुन वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहर अभियंता या पदावर शासनाकडुन प्रतिनियुक्ती अधिकारी देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामात पानझडे यांचे निलंबन केले होते. त्यांच्याविरूध्द विभागीय चौकशीही सुरू होती. आता पुन्हा एकदा त्यांना नियुक्ती देतांना शासन निर्णयातील निकषाचे पालन केलेले नाही. सेवानिवृत्त अधिकारी यांना देण्यात आलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे.

कारण शासन निर्णयामधील अ.क्र. १५ चा प्रथम भंग केलेला आहे. तसेच प्रशासनाने भ्रष्ट अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर पुन्हा नियुक्ती देण्याअगोदर शासनाशी पत्र व्यवहार करून शहर अभियंता या पदावर प्रतिनियुक्तीवर शासनातर्फे अधिकारी मागविणे आवश्यक होते. किंवा मनपातील कार्यरत अधिकारी यांना पदोन्नती देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनास सखाराम पानझडे यांचा पुळका का आला? हे समजले नाही. तसेच कोणत्या कामासाठी त्यांना पुन्हा सेवेत घेतले याचा बोध होत नाही. सखाराम पानझडे हे सेवानिवृत्त झाल्यावर दिलेली बेकायदेशीर नियुक्ती रद्द करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सफाई कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद मोईनोददीन इनामदार यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!