मुंबई : राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार यावर आता शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातचं आता भाजपकडून प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत बावनकुळे यांना डच्चू देण्यात आला आहे.
येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपला विधानसभेच्या संख्याबळानुसार मिळणार 4 जागा मिळाल्या आहेत. या 4 जागांसाठी भाजप कोणाची निवड करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने ज्येष्ठांना मागे सारत काही आयारामांना संधी दिली आहे.

दरम्यान भाजपकडून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत बावनकुळे यांना संधी दिली जाईल, असे बोलले जात होते. मात्र पक्षाने प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.
गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला होता. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये आले होते. त्यांना विधानसभेला उमेदवारी दिली जाईल असे वाटले होते. मात्र आता मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री
चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारने वाढला, मुंबईची परिस्थिती चिंताजनक !
चीनने गंभीर चूक केली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेसिडेंट ट्रम्प पुन्हा भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

