टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन केले आहे. शपथविधीनंतर सरकारने लगेचच मंत्रिपदं जाहीर केली आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा एकदा अवजड मंत्रिपद आल आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये काहीशी नाराजी दिसत आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना नाराजी कळवली आहे. तसेच खातं बदलून मिळावं अशीही मागणी करण्यात आली आहे. मोदींच्या या मंत्रिमंडळात शिवसेनेला यावेळेस दुसऱ्या मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र यावेळेसही शिवसेनेला अवजड खात्याचे मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे हे अवजड खाते शिवसेनेला अवघड जागेचे दुखणे झाले आहे.
दरम्यान राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नाराजीची दखल भाजप घेणार का? शिवसेनेला खातं बदलून मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच 2014मध्ये देखील शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय होतं. त्यावेळी अनंत गीते हे केंद्रात शिवसेनेचे मंत्री होते.तर यावेळस अवजड खात्याची जबाबदारी शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडे आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
