Share

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, राष्ट्रपतींना राजु शेट्टी यांनी केली विनंती

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :- देशातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे , उत्पादन खर्च निघत नसल्याने दिवसोंदिवस शेतकरी कर्जाच्या दरीत लोटला जात असल्याने देशात शेतकरी आत्मह्त्येचे सत्र सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांच्या समस्येवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे या करीता देशभरातील करोडे शेतकऱ्यांनी १० मे रोजी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकर्यांना निवेदन दिले तसेच १ मे रोजी देशातील हजारो ग्रामपंचायतींनी संसदेचे शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे असा ग्रामसभेचा ठराव देखील मा.राष्ट्रपती यांना पाठविले. आज सकाळी मा.खा श्री राजु शेट्टी यांनी अखिल भारतीय किसान समन्यव्यक कॅार्डेनिशन कमेटीच्या वतीने राष्ट्रपती महोदयांची भेट घेत शेतकऱ्यांच्या समस्येवर त्वरीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची त्यांना विनंती केली.

कोणाच्या ह्ट्टाला पुर्ण करण्या करीता जी.एस.टी बील पारीत करण्यासाठी मध्यरात्री संसदेचे सर्व सदस्यांना उपस्थित होता येते तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशातील लोकसभेचे व राज्यसभेचे सर्व खासदार एकत्र का येत नाही असा सवाल त्यांनी मा.राष्ट्रपती महोदयांकडे उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्या नंतर प्रथमच देशातील शेतकरी त्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करत आहे व मा.राष्ट्रपती महोद्यांनी त्यांच्या विशेष अधिकारात केंद्र सरकारला शेतकरी समस्येवर चर्चा करण्यासाठी त्वरीत अधिवेशन बोलविण्यास आदेशित करण्याची  राजु शेट्टी यांनी मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रवक्ते ॲड् योगेश पांडे यांनी ही माहिती दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!