Share

कोरोनाचा धोका वाढला : ‘या’ कॅबिनेट मंत्र्यालाही झाली कोरोनाची लागण 

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य ते अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते हे देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लखनौमधील एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लखनौ दौऱ्याच्यावेळी महेंद्र सिंह त्यांच्यासोबत होते, शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मला कोरोनाची लागण झाली असून तब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वॉरन्टाईन करावं, असं आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलं आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची COVID-19 चाचणी देखील काल पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन!

संयम ठेवून आहोत…नाही तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ; शिवसेना नगरसेवकाने दिला मनसेला ईशारा

राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!