Share

केंद्रीय नेत्यांची दिशाभूल करून राज्यातील काँग्रेस नेते सत्तेसाठी लाचार झाले- राधाकृष्ण विखे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं आहे. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यातचं काल सोनिया गांधी यांचा लेटर बॉम्ब आला आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिले. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. भविष्यात आदिवासी दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

या सरकारचा कुठलाही किमान समान कार्यक्रम नाही. केवळ सत्ता वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे, हे सोनिया गांधी यांच्या पत्राद्वारे स्पष्ट झालं आहे. सत्ते करिता किती लाचारी स्वीकारायची हे स्थानिक नेतृत्वाने करून दाखवलं आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणाचंही नाव न घेता केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!