🕒 1 min read
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवला असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. पण, आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे.
हा पुरस्कार देण्याबाबत का शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केलेला आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना देशांमध्ये माहिती प्रसारण तंत्रज्ञान व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यामुळे राजीव गांधी स्मृती दिनानिमित्त माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात यावा याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजींनी आपल्याला भारत देशात तंत्रज्ञान आणत आधुनिक क्रांती केली. त्यांच्या नावे पुरस्कार जाहीर करून आमच्या महाविकास आघाडी सरकारने खऱ्या अर्थाने स्व. राजीव गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. https://t.co/B8o4epvLCk
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 11, 2021
20 ऑगस्ट, 2021 रोजी या पुरस्काराची घोषणा करून 30 ऑक्टोबर, 2021 पूर्वी संस्था निवडीचे निकष व चयन महाराष्ट्र तंत्रज्ञान व माहिती महामंडळामार्फत पुरस्कार देण्यात यावा, असे शासन आदेशात सांगण्यात आला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजींनी आपल्याला भारत देशात तंत्रज्ञान आणत आधुनिक क्रांती केली. त्यांच्या नावे पुरस्कार जाहीर करून आमच्या महाविकास आघाडी सरकारने खऱ्या अर्थाने स्व. राजीव गांधीजींना आदरांजली वाहिली आहे असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
