Share

…पण काँग्रेसच्या मनात आहे की ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता गोव्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची माहिती दिली. तसेच गोव्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा नवा प्रयोग करण्यार असल्याचेही ते म्हणाले होते. दरम्यान, निवडणुकांपूर्वी काँग्रेस सोबत नसणार हे आता राऊतांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,’गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. परंतु काँग्रेसच्या मनात आहे की ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे’, असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पंजाब, उत्तर प्रदेश, मनीपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठिक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा,’ असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!