Share

औरंगाबादेत मध्यवर्ती बस स्थानकातून सिल्लोडला बस रवाना; पूर्ण क्षमतेने बस सुरु होण्याची प्रवाशांना प्रतिक्षा!

Published On: 

औरंगाबाद: एसटी संप हळुहळु मिटतांना दिसत आहे. मात्र गेल्या दोन दिवसात धावलेल्या काही बसवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याने रुजू होणार्‍या चालक-वाहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून आज डेपो क्रमांक २ मधून सिल्लोडला बस धावली. तर सिडको आगारातून आज एकही बस आज धावलेली नाही. त्यामुळे एसटीचा संप अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. प्रवासी बस सुरू होण्याची वाट पाहत तासनतास स्थानकावर खोळंबले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. या संपाचा आज सलग २१ वा दिवस. मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात महामंडळाला यश आलेले नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आम्हाला ही पगारवाढ नको असे म्हणत कर्मचारी विलीनीकरण या मुद्द्यावर अडून बसले आहेत. त्यामुळे एसटी संपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

शनिवारी सिडको बस स्थानकातून जालन्याला ४ बस रवाना झाल्या आहेत. मात्र काही अज्ञातांकडून या बस वर हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सिडको बस स्थानकातून एक तर मध्यवर्ती बसस्थानकातून एक अशा प्रत्येकी दोन बस धावल्या. तर आज सोमवारी (दि.२९) केवळ मध्यवर्ती बसस्थानकातून सिल्लोडला एकमेव बस रवाना झाली आहे. प्रदीर्घ अशा संपामुळे काही चालक-वाहक कामावर परतत आहे. मात्र हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने धावणाऱ्या बसेसची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

परिवहन मंत्र्यांना तक्रार

गेल्या अनेक दिवसांपासून संप असल्याने कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्याने थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती हाती येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रुजू झालेले, न रुजू झालेले तसेच सुरू होऊनही ज्यांच्यासोबत वरिष्ठांकडून भेदभाव होत आहे. अशा कर्मचाऱ्यांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!