Share

बंटी बबली २ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; सलमान खान करणार लाँच

Published On: 

मुंबई : कोरोना संसर्गामुळे थांबलेली बॉलीवूडची गाडी हळुहळू रुळावर येत आहे. मागील आठवड्यात अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ आणि अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आता यशराज बॅनरचा ‘बंटी और बबली’ हा सिनेमा देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी आगामी ‘बंटी और बबली २’ या सिनेमात दिसणार आहेत. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे काम कोरानामुळे बरेच दिवस रखडले होते. येत्या २३ मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे अशी चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु आहे. आणि हा ट्रेलर लाँच करण्यासाठी यशराज सलमान खानला पाचारण करण्याची शक्यता आहे.

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाले आहेत. ‘बंटी बबली २’ ट्रेलर रिलीज होण्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, आता या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जीसह या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी वाघ मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!