Share

बुमराह की बोल्ट? माफ करा पण मी निर्णय घेऊ शकत नाही, मायकल वॉनने दिले उत्तर

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगितीनंतर भारतीय संघ २ जुन रोजी इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. न्युझीलंडविरुद्ध सामन्याच्या पार्श्वभूमिवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक मोठे वक्तव्य केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मायकल वॉनला भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह का न्युझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट या दोघात श्रेष्ठ कोण असा प्रश्न केला. यावर वॉन म्हणाला माफ करा पण मी निर्णय नाही घेऊ शकत. माझ्या उभ्या आयुष्यात प्रथमच मला असे उत्तर द्यावे लागत आहे. दोघेही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. बोल्ट बऱ्याच काळापासून न्युझीलंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. तर बुमराह जागतीक दर्जाचा शानदार गोलंदाज आहे. बुमराहने इंग्लंडमध्ये काही दिवसापुर्वी चांगली कामगीरी केली होती. असे वॉन म्हणाला.

बुमराह आणि बोल्ट हे दोन्ही गोलंदाज आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून एकत्र खेळतात. मात्र जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या निमीत्ताने ते प्रतिस्पर्धी म्हणून मैदनात उतरणार आहे. बुमराहने २०१८ साली कसोटीत पदार्पण केले असुन त्याने १९ कसोटी सामने खेळताना २२.१० च्या सरासरीने ८३ गडी बाद केले आहे. तर बोल्टने न्यूझीलंडकडून २०११ साली कसोटीत पदार्पण केले असुन बोल्टने ७१ कसोटी सामने खेळताना २८.०२ च्या सरासरीने २८१ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!