Share

शिवसेना, मनसेच्या विरोधानंतरही निघाले बुलेट ट्रेनचे टेंडर

Published On: 

मुंबई : अहमदाबाद ते मुंबई दरम्यान होणाऱ्या बुलेट ट्रेनला शिवसेना आणि मनसेचा विरोध आहे. पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या जमिन अधिग्रहणाला मनसे शिवसेनेच्या नेत्वृत्वाखाली शेतकऱ्यांनी विरोध केला आहे . पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ७३ खेडेगावांमधील ३०० हेक्टर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे.

मात्र दुसरीकडे मनसे आणि शिवसेना यांच्या विरोधाला न जुमानता देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनची टेंडर प्रक्रिया अखेर सुरु झालीये. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गातील पुलांच्या कामाचं पहिलं टेंडर गुरुवारी नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड ने काढलं. गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात जमिन अधिग्रहणावरुन मोठा विरोध होत असताना ही टेंडर प्रक्रिया सुरु झालीये हे विशेष. डिसेंबर २०१८ पासून बांधकामाला सुरुवात होईल असं रेल कार्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय.

या प्रकल्पाबद्दलचे लोकांचे गैरसमज दुर करु. शेतक-यांच्या सिंचन प्रकल्पांना आम्ही धक्का लावणार नाही. उलट चांगल पॅकेज, आरोग्यसुविधा, रोजगार उपलब्ध करुन देऊ असं सांगत संवाद साधण्याच काम सध्या सरकारकडून सुरु आहे .

कला, संस्कृती आणि पर्यटनाला उत्तेजन मिळण्यासाठी राजदूतांनी सहकार्य करावे : फडणवीस

शिवसेनेचा विरोध डावलून केंद्राचा नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!