Share

बनावट पावत्यावर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट; नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  बनावट पावत्यावर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासंदर्भात सुरू असलेल्या तपासात डीजीजीआय, नाशिक प्रादेशिक विभाग, डीजीजीआय, नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अटक केली.

हा व्यावसायिक अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीने जारी केलेल्या बनावट पावत्यांवर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेत आहे आणि या बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी करत आहे अशी माहिती डीजीजीआयला मिळाली होती .

या व्यावसायिकाने ओळख पटू नये यासाठी आपली पूर्वीची नोंदणी रद्द केली होती आणि वेगळ्या व्यवस्थापनाअंतर्गत नवीन नोंदणी केली होती. मात्र, ऑनलाइन डेटा मायनींग टूल्सच्या मदतीने रद्द केलेल्या नोंदणीची संपूर्ण माहिती मिळवण्यात आली आणि खोटे इनपुट क्रेडिट घेतल्याचे छाप्यांदरम्यान आढळून आले.

पश्चिम बंगालमधील अस्तित्वात नसलेल्या आणि कोणतीही वस्तू किंवा सेवा पुरवली नाही अशा काही कंपन्यांनी जारी केलेल्या इनव्हॉईसच्या आधारे या बांधकाम व्यावसायिकाने 4.86 कोटी रुपयांच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आहे. जेव्हा वस्तुस्थिती मांडण्यात आली तेव्हा चौकशी दरम्यान हे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याची कबुली त्याने दिली.

त्यानंतर अतिरिक्त महासंचालक, डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिट यांनी जारी केलेल्या अटक-वॊरंटच्या आधारे या बांधकाम व्यावसायिकाला, डीजीजीआय, नाशिक प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बांधकाम व्यावसायिकाने आत्तापर्यंत 25 लाख रुपये दिले आहेत आणि ही संपूर्ण रक्कम लवकरच जमा होईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!