Share

#Budget2021 : शेतकऱ्यांच्या तसेच मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल – चंद्रकांत पाटील

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान,केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या सुधारणांसाठी तीन नवीन कायदे लागू केले आहेत. या कायद्याला विरोध करत दिल्लीसह सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतआहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं अशी अपेक्षा संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. करोनाची लस मोफत देणार का? हे पाहावं लागेल असंही ते म्हणाले आहेत. राज्यांचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारनं परत करावा असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.

तर दुसऱ्या बाजूला बजेट कितीही मोठे असले तरी नेत्याचा एक अंदाज असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांनासुखी आणि सुरक्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. यातूनच शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तसंच मध्यमवर्गाची अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल असं मला वाटतं,  असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत, अशा परिस्थितीत हे बजेट सादर केलं जाणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि त्यावरील नियंत्रण पाहता गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मेपर्यंत लॉकडाउन लागू होता. या लॉकडाउन काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनलॉकिंगच्या काळातही अद्यापही अनेक लोक या परिस्थितीतून बाहेर पडू शकलेले नाहीत. मध्यमवर्गीयांची,तरुण वर्गाची सरकारकडून अपेक्षा वाढली आहे.

दरम्यान,वित्त मंत्र्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या सन 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणात, पुढील वित्त वर्षामध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धिदर 11 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना महामारीत उत्पादन आणि सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला. तर कृषी आणि कृषीलाला असलेल्या जोडधंद्यांचे उत्पन्न महामारीतही वाढल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागातील गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!