Share

#Budget2021 : कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद : अर्थमंत्री

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.

आरोग्य क्षेत्राला अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार झुकते माप देताना दिसत असून आजार रोखणं हे सरकारसमोरचं सर्वात मोठं लक्ष्य आहे असे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना सांगितले आहे.

देशात 15 आरोग्य आपत्कालीन केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. सरकारने कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प संकटातील संधीप्रमाणे आहे असे देखील त्या म्हणाल्या.

आज भारताकडे दोन करोना लस उपलब्ध असून फक्त आपल्याच नाही तर अनेक देशातील नागरिकांची करोनाविरोधात सुरक्षा केली जात आहे. आणखी दोन लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली असून १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्रं आणि दोन मोबाईल हॉस्पिटल्सची घोषणा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!