Share

विधानसभा निवडणुकीत बसपा औरंगाबाद जिल्ह्यातील ९ जागा लढवणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) वतीने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 9 विधानसभांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

झोन प्रभारी डॉ. ना. तु. खंदारे, राज्याचे महासचिव रवींद्र गवई यांनी जिल्ह्यातील नऊ मतदार संघासाठी मुलाखती घेतल्या. इच्छुकांची नावे गोपनीय ठेवण्यात आली असून, सोमवारी मुंबईतून उमेदवारी जाहीर होणार असल्याचे जिल्हा प्रभारी सचिन बनसोडे म्हणाले.

वैजापूरमधून दोन कार्यकर्ते व एक इतर पक्षातील, गंगापूरमध्ये एक कार्यकर्ता व एक इतर पक्षातील, फुलंब्री व पैठणमध्ये एक एक कार्यकर्ता, सिल्लोडमधून दोघे, तर कन्नडमधून तिघांनी मुलाखती दिल्या. शहरातील पूर्व मतदारसंघातून विद्यमान नगरसेवक, तर मध्यमधून पुरस्कृत नगरसेवकासह दोघांनी तर पश्चिममधून इतर पक्षातील तिघांनी मुलाखती दिल्याचे बनसोडे यांनी सांगितले. नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

बसपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांचा चांगला प्रतिसाद आहे. सोमवारी बसप भवन मुंबईतून 70 टक्के जागांच्या उमेदवाऱ्या जाहीर होतील असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178212298281799680?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178212663416868864?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!