Share

राजस्थानात हातावर ‘हत्ती’ भारी, कॉंग्रेस विरोधात मतदान करण्याचा मायावतींचा व्हीप

Published On: 

जयपूर : राजस्थानमधील राजकीय संकटात रोज नवीन ट्विस्ट येत आहे. आता बहुजन समाज पक्षाने (बसपा) रविवारी काढलेल्या व्हिपमुळे राजस्थानमधील गेहलोत सरकार च्या अडचणीत भर पडली आहे. बसपाने राजस्थानमधील आपल्या सहा आमदारांना व्हिप जारी करून गहलोत सरकारविरोधात मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राजस्थानमधील राजकारणाला आणखी एक नवीन वळण लागलंय.

राजस्थानमध्ये बसपाच्या तिकीटावर सहा आमदार निवडून आलेत. आर. गुधा, लखन सिंह, दीप चंद, जे. एस. आवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली हे सह जण बसपाचे आमदार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे सहा आमदार कॉंग्रेसमध्ये विलीन झाले होते. राजस्थान विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अविश्वास ठराव किंवा कुठल्याही कारवाईच्या वेळी कॉंग्रेसविरोधात मतदान करण्याचे निर्देश बसपाने सर्व आमदारांना दिले आहेत.

…अन् कार्यकर्त्याने मुलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’ ;पंकजाताईंनीही दिला आशीर्वाद

आता बहुजन समाज पार्टीने व्हिप जारी केला आहे. मात्र, बहुजन समाज पार्टीला राज्य घटक काँग्रेसमध्ये विलीन होण्यास राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. जवळपास १ वर्षापूर्वी बहुजन समाज पार्टीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले आहे, अशा परिस्थितीत व्हिप कसा लागू होईल? दरम्यान, बहुजन समाज पार्टी आता यासंदर्भात राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या मंजुरीच्या निर्णयाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या ‘अशा’ शुभेच्छा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!