Share

…अन् कार्यकर्त्याने मुलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’ ;पंकजाताईंनीही दिला आशीर्वाद

Published On: 

🕒 1 min read

बीड : पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व सर्व सामान्यांमध्ये किती लोकप्रिय आहे, याचा प्रत्यय आज अनुभवास आला. पंकजाताई मुंडे यांचा आज वाढदिवस होता. एका कार्यकर्त्याने त्याच्या घरी आज जन्मलेल्या कन्येचे ‘पंकजा’ असे नामकरण करून त्यांचा अनोखा वाढदिवस साजरा केला.

पंकजा मुंडे यांचा २६ जूलै हा वाढदिवस. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कुणीही भेटायला न येता आरोग्याची काळजी असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. पंकजाताई मुंडे यांचं कार्यकर्त्यांचं जाळं मोठं आहे. ताईंचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी मोठा दिवस असतो. ताईंच्या एका कार्यकर्त्याला आजच्या दिवशी कन्यारत्न झालं. मग काय, त्याने त्या चिमुकलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’ आणि ताईंनीही तीला खास आशीर्वादही दिलेत. केरबा पाटील केंद्रे गोलेगांवकर हे पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत.

सरपंच असलेल्या केरबा पाटील यांना आज कन्यारत्न झालं. आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवशी कन्यारत्न झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. मग काय, त्यांनी आपल्या मुलीचं नाव ‘पंकजा’ असं ठेवलं. केरबा पाटील यांनी या चिमुकलीचा फोटो ट्विट करत पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पंकजा ताई यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी होत तिला आशीर्वादही दिलेत. ‘शुभेच्छांसाठी धन्यवाद आणि छोट्या पंकजाला आशीर्वाद’ असं पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे केरबा यांचं कुटूंब भारावून गेलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!