Share

मनसेकडून नाना पाटेकरांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती : तनुश्री दत्ता

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण सांगितली आहे. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली असा सनसनाटी आरोप तनुश्रीने केला आहे.

नेमकं काय म्हणाली आहे तनुश्री दत्ता ?
2008 मध्ये ‘हाॅर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला. नानांनी माझ्या एका गाण्यामध्ये मला त्रास देणारे आक्षेपार्ह सीनही ठेवले होते.

नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शुटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी सेटवर तणावपूर्ण वातावरण होते. एका कलाकाराने जर सेटवर मनसेचे कार्यकर्ते बोलावले तर काय वातावरण असेल असंही तुनश्रीने सांगितलं.

नानांनी माझी माफी मागावी अशी अपेक्षा होती पण त्यांनी राजकीय आणि कायदेशीरपणे खूप दिवस त्रास दिला असा आरोपही तनुश्रीने केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!